पेठ - पेठ तालुक्यातील करंजाळी वनपरिक्षेत्राच्या कक्षेतील दिडोंरी तालुक्यातील फोफळवाडे येथील शेतकरी वसंत छबु बोके हे दि.(३१) रोजी दिवसा आपल्या शेतातील वालाच्या शेंगा खुडत असतांना शेता नजिक दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतक-यावर अचानक झडप घातली यात शेतक-याच्या हाताला जखमी केले बोके यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्या परिसरात पसार झाला
सदरील घटनेची प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक सिध्देश्वर सावर्डेकर यांनी तात्काळ दखल घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक निलेश कांबळे हे कर्मचा-यासह बिबट्याचा पिंजरा घेवुन घटनास्थळी दाखल झाले .
पिंजरा लावुन वनकर्मचारी परिसरात तळ ठोकून होते
त्याच दिवशी रात्री आठ वाजेच्या सुमारास अंदाजे सुमारे तीन वर्ष वयाचा नर जातीच्या बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले.या कामगिरीत उपवनसंरक्षक निलेश कांबळे यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर करंजाळी वनपरिमंडळ अधिकारी रवी सोनार,वनपाल मजहर शेख, तानाजी भोये,उमाकांत बागुल,रजनी चौधरी,जितेंद्र गायकवाड, मंगेश दळवी,शशिकांत भोये,पुंडलिक राऊत, हरिदास मिसाळ,भरत जगातप,भाऊसाहेब सुर्यवंशी,उमेश मेगाळ,मंगेश दळवी आदीसह कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
फोफळवाडे व परिसरातील नागरिकांमध्ये या बिबट्याच्या परिसरातील अधिवासामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली होती आज या बिबट्या वनकर्मचा-यांनी शिताफीने जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतक-यांनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.