विधासभा निवडणुकीत महायुती सरकारने ऐतिहासिक विजय मिळवला तर महाविकास आघाडीला दारुण पराभव सहन करावा लागला आहे. त्यानंतर राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. महायुती सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असून महाविकास आघाडी आणि महायुती मधील अनेक नेते मोठं मोठे गौप्य स्फोट करत आहेत.
भाजप सोबत आम्ही सरकार बनवलं असतं, त्यांनी शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री झाले असते. दुसऱ्या कोणाचा प्रश्नच नव्हता. उद्धव ठाकरे याबाबतीत प्रमाणिक आहेत. त्यांनी शिंदेंची विधिमंडळ नेतेपदी निवड करून तसा सिग्नल दिला होता. पण भाजपने शब्द पाळला नाही. असे मोठं विधान ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनू दिलं नाही. असे म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडी तयार करून बनवलं पाहिजे ही एकनाथ शिंदे यांची भूमिका होती, त्यावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू नका, असे शरद पवार यांनी सांगितलं होतं का ? असा प्रश्न राऊतांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, यात लपवण्यासारखं काय आहे ? भाजपबरोबर आम्ही सरकार बनवलं असतं, त्यांनी शब्द पाळला नाही.
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या मुद्दावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. त्या निर्णयात स्वत: एकनाथ शिंदे सहभागी होते. सामुदायिक निर्णय होता. त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांना कुठलं खातं मिळतं. हे त्यांच्यासाठी महत्वाचं नव्हतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे ज्युनियर आहेत. त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदासाठी विचार झाला नाही. असेही ते म्हणाले.