देशातील दोन नंबर आणि महाराष्ट्रातील एक नंबरचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यामुळं संस्थानच्या कारभारात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाला विशेष महत्त्व असून राज्य शासनाने साईबाबा संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी भीमराव दराडे यांची नियुक्ती केली आहे. दराडे हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून नेवाशाचे रहिवाशी आहेत.
राज्य शासनाने काल त्यांची प्रतिनियुक्तीवर साई संस्थानकडे बदली केली आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या तुकाराम हुलवळे यांची या पदावरून बदली झाली, गेली काही महिने त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार संदीप भोसले यांच्याकडे होता. आता पुन्हा एकदा दराडे यांच्या रुपाने जिल्ह्याच्या भूमीपुत्राला डेप्युटी सीईओ पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
भीमराज दराडे यांच्याकडं यापूर्वी जळगाव जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी होती. त्यांनी प्रशासनात विविध पदांवर काम करत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत शासनानं त्यांची प्रतिनियुक्तीवर साई संस्थानकडं बदली केली आहे. काही महिन्यांपूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेले तुकाराम हुलवळे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर संदीप भोसले यांच्याकडं या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र, आता भीमराव दराडे यांच्या रूपानं पुन्हा एकदा जिल्ह्याच्या भूमिपुत्राला या महत्त्वाच्या पदावर कार्य करण्याची संधी मिळाली आहे.