देवळ्यात वेश्या व्यावसायासाठी हॉटेल मध्ये डांबून ठेवलेल्या
देवळ्यात वेश्या व्यावसायासाठी हॉटेल मध्ये डांबून ठेवलेल्या "त्या" महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न
img
दैनिक भ्रमर

देवळा : देवळा येथे गेल्या चार दिवसांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यातील पिडीत महिला या बांग्लादेशी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांनी दिली. त्यांच्याविरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार (दि. २१) रोजी देवळा येथील मालेगांव रोडवरील हॉटेल वेलकममध्ये पोलीस अधिक्षक  विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर  यांना मिळालेल्या माहितीनुसार    उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  सार्थक नेहेते, सपोनि पुष्पा आरणे यांच्या पथकाने चालु असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई करुन दोन पिडीत महिलांना ताब्यात घेत हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या पीडित महिला बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना बळावला असल्याने त्यांची सखोल केली असता त्या दोन्ही पीडित महिला बांगलादेशी असल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाले आहे. या महिलांना पोलिसांनी आज कळवण न्यायालयासमोर उभे केले असता या महिला लपून छपून अनधिकृतपणे भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवुन व मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय, वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय किंवा भारत सरकारने अथवा भारतीय सीमेवरील नोंदणी अधिकाऱ्यांनी नेमुन दिलेल्या मार्गा व्यतिरिक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करुन मिळुन आल्याने त्यांच्या विरुद्ध परकिय नागरीक आदेश 1948 सह कलम 14 परकिय नागरीक आदेश 1946 नुसार कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली .

न्यायालयाची परवानगी घेऊन सदर महिलांना अटक करण्यात येणार आहे. यातील मुख्य आरोपी हॉटेल  मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे रा. देवळा याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदेर्शनाखाली सुरु आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group