मंत्री धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराची लागण ; करुणा शर्मांनी  दिली ''ही''  प्रतिक्रिया
मंत्री धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराची लागण ; करुणा शर्मांनी दिली ''ही'' प्रतिक्रिया
img
दैनिक भ्रमर
काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती.  दरम्यान  मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. यावर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर आता त्यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटे निट बोलता देखील येत नाही. त्यामुळे आपण कॅबिनेट मिटींग आणि जनता दरबाराला उपस्थित राहिलो नाही असा खुलासा त्यांनी केला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या आजारावर आता करुणा शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

आधी त्यांना डोळ्याचा आजार  झाला मग त्यांना कुठलातरी आता चायना वरून आलेला बेल्स पाल्सी रोग झाला. नेमकं त्यांना झालंय काय त्यांनाच विचारा, त्यांनी आता आराम करावा. माझी अशी मागणी आहे की, कोणत्याही नेत्याला जर आजार झाला तर त्यांना फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या रुग्णालयात भरती न करता या सगळ्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये भरती करावं. जेणेकरून समजेल की यांना खरच काही आजार झालाय का असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बायको म्हणून त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं अशाच शुभेच्छा देईल. पण यामध्ये काहीतरी गौड बंगाल वाटतंय, ते आजारपणाचा बहाणा करत असतील असं यामध्ये मला दिसून येत आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर इतके घोटाळ्याचे आरोप झाले की आता लोकांसमोर जाण्यासाठी त्यांच्याकडे तोंड नाहीये, म्हणून आजाराचा बहाणा करत असतील असं मला वाटतं असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

11 डिसेंबर 2020 रोजी सुद्धा आम्ही फिरण्यासाठी गेलो होतो, तेव्हा आमच्यात भांडण झालं आणि मग ते तिथून मुंबईत पोहोचले आणि रुग्णालयात दाखल झाले, तेव्हा देखील असेच म्हणाले की पोटाचा कुठलातरी आजार झाला आहे, असा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला. सध्या धनंजय मुंडे यांच्यावर रिलान्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group