नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस व बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र सातपूरकर (वय 66) यांचे हदयविकाराच्या झटक्याने आज दुपारी निधन झाले.
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स आणि नाशिक बॉडी बिल्डर्स असोसिएशन मध्ये राजेंद्र सातपूरकर यांनी भरीव काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. राजेंद्र सातपूरकर यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सातपूरकर यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना असा परिवार आहे. सातपूरकर यांच्या निधनाने नाशिक व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.