सोलापुरातून एक बातमी समोर आहे. डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपणा आल्याची तक्रार सोलापुरात एक मंडळाविरुद्ध दिली आहे तर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून हे बहिरपणे बनाव असल्यास म्हणत चौकशीची मागणी केली आहे. याबाबत प्रशासनाकडून सावध भूमिका घेण्यात आली आहे.
सोलापुरातील राजू यादगिरीकर यांनी सोलापुरातील एका मंडळाविरोधात डॉल्बी आवाजामुळे बहिरेपणा आल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून सोलापुरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात मंडळा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.18 जानेवारीच्या संध्याकाळी सोलापुरातील देगांव येथे बी. जी. ग्रुपच्यावतीने डॉल्बी लावून जल्लोष साजरा करण्यात येतं होता. या डॉल्बीचा आवाज खूप मोठा असल्याने त्रास होवू लागल्याने फिर्यादी राजू यादगीरिकर याने मंडळाजवळ जावून मंडळातील लोकांना डॉल्बीचा आवाज कमी करा असं सांगितलं.
मात्र ‘मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करुन सुमारे अर्धा तास गर्दीतून बाहेर पडू दिले नाही. या आवाजामुळे दोन्ही कानाच्या नसा कमकुवत होवून काही ऐकू येत नाही.’ अशी फिर्याद राजू यादगिरीकर याने पोलिसात दिली आहे. त्यांच्या या फिर्यादीवरून सोलापुरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू यादगिरीकर यांनी दाखल केलेली तक्रार चुकीची असल्याचे म्हणत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी जयंती साजरी करण्यासाठी जे नियम घालून दिले होते. त्या नियमांच्या चौकटीत राहून सर्व मंडळांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली आहे. त्यामुळे यादगिरीकर यांनी प्रकारणातील फिर्यादी हे खोटा आरोप करतायत. त्यांना कोणताही बहिरेपणा आलेला नसून आज सकाळी दुकानात खरेदी करताना सीसीटीव्हीत देखील दिसतं आहे.
त्यामुळे पोलिसांनी मंडळाविरोधात हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी केलाय. या व्यक्तीची सिव्हिल सर्जन मार्फत तपासणी करण्यात यावी, तसंच खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी फिर्यादीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी केली आहे.