''छावा' चित्रपट चांगलाच गाजला असून सध्या महाराष्ट्रात 'छावा' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर चांगली कमाई केली असून, 2025 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे, तसेच 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपटही ठरला आहे. आता आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये छावा चित्रपटाचे मोफत प्रदर्शन करण्याची घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींसाठी 7 दिवस हा चित्रपट मोफत दाखवला जाणार आहे.
सोमवारपासून महिलांसाठी छावा चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग सुरु झाले असून, ते रविवारपर्यंत चालणार आहे. एका महिलेला एक तिकीट देण्याचे नियोजन आहे. हा चित्रपट पाहून प्रत्येक महिलेच्या मनात देशप्रेमाची, धर्मप्रेमाची भावना निर्माण होईल, असा विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. छत्रपती शंभाजी महाराजांचे धैर्य, शौर्य, ज्ञान आणि कामगिरी लोकांपर्यंत हे या उपक्रमाचा उद्देश आहे. यासह आमदारांनी छावा हा चित्रपट करमुक्त करण्याची विनंती केली असून, सर्व महाराष्ट्रीय नागरिकांना तो पाहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.