शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबद्दल महायुती सरकारची मोठी घोषणा !
शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबद्दल महायुती सरकारची मोठी घोषणा !
img
दैनिक भ्रमर
राज्यात  महायुती सरकार स्थापन झाले असून महायुती सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. आधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना फायदा मिळाला असून आता  शासकीय कर्मचाऱ्यांच्या  महागाई भत्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. आज मंगळवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला आहे

 महागाई भत्ता आता ५० टक्क्यांहून आता ५३ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. १ जुलै २०२४ पासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे. जुलै २०२४ पासूनची थकबाकी या महिन्याच्या पगारात जमा होणार आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

दिनांक 1 जुलै, 2024 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन सरचनेतील मुळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 50% वरुन 53% करण्यात यावा. सदर महगाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै, 2024 ते दिनांक 31 जानेवारी, 2025 या कालावधीतील थकबाकीसह फेब्रुवारी, 2025 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. 3. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील तरतुदी आणि कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागू राहील. 

यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्याांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा, असं या पत्रकामध्ये नमूद केलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group