पती पत्नीचं नातं म्हणजे एकमेकांचा सहारा, सुख दुःखात साथ देणारा साथीदार, एकमेकांची सावली म्हणजे पती पत्नी, पती पत्नी लग्नात एकमेकांना मरेपर्यंत साथ देण्याचे वाचन देतात. हेच वचन मरणांनंतर सुद्धा एका पत्नीने निभावले आहे . पतीच्या निधनानंतर पत्नीने 6 दिवसात प्राण सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पतीच्या निधनाला आठवडाही होत नाही तोच पत्नीनेही प्राण सोडल्याची धक्कादायक घटना सावंतवाडीमध्ये घडली आहे, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोघेश बाबू नाईक या 55 वर्षांच्या व्यक्तीचं अल्पशा आजाराने निधन झालं. मोघेश नाईक यांच्या मृत्यूचा धक्का त्यांच्या पत्नी मयुरी यांना सहन झाला नाही.
पतीच्या मृत्यूनंतर मयुरी मोघेश नाईक या 52 वर्षांच्या महिला आजारी पडल्या. मयुरी यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण रविवारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पतीच्या निधनाच्या 6 दिवसांनंतरच मयुरी यांनी प्राण सोडले.
मोघेश नाईक हे मागच्या काही काळापासून आजारी होते, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण 11 फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं. पतीच्या विरहाचं दु:ख सहन न झाल्यामुळे मयुरी यांनी पुढच्या 6 दिवसांमध्येच जग सोडलं.