पत्नीवर अश्लिल कमेंट केल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या
पत्नीवर अश्लिल कमेंट केल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या
img
दैनिक भ्रमर
गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून अनेक गंभीर गुन्हे  उघडकीस  येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांमधील वाद विकोपाला गेल्याने मित्रानेच मित्राची हत्या केली असल्याची घटना घडली आहे. पत्नीवर अश्लिल कमेंट केल्याने मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , पुण्यातील कात्रज भागात आंबेगाव पठार पसिरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये मित्र मद्यप्राशन करायला बसले होते, त्यावेळी घटस्फोटीत बायकोवर अश्लिल आणि खालच्या भाषेत कमेंट केली गेली, या रागातून मित्राने त्याच्या मित्राच्याच डोक्यात लोखंडी रॉडने वार केले, यात त्याचा मृत्यू झाला. नयन प्रसाद असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मित्राची हत्या करून आरोपी पश्चिम बंगालला फरार झाला होता, पण भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली. बिरान सुबल कर्माकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी परराज्यात जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

10 फेब्रुवारी 2025 ला रात्री 12.30 च्या सुमारास चिंतामणी चौक आंबेगाव पठार येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये एक बॉडी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी गेली, तेव्हा मृतदेह डिकम्पोज व्हायला लागला होता. ही हत्या एक ते दोन दिवस आधी करण्यात आल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं. मृतदेह ओळखून येण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता.

मृतदेहाच्या डोक्याला, पाठीला हत्याराने मारहाण केल्याचं दिसत असल्यामुळे पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केला. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मृत व्यक्तीचं कुणी ओळखीचंही नव्हतं, कारण तो बिहारचा होता. मृत्यू झालेल्याचं नाव नयन गोरख प्रसाद असल्याचं नंतरच्या तपासात निष्पन्न झालं. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक मोबाईल मिळाला, या मोबाईलच्या तपासावरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.

बिहारच्या सिवानचा असलेल्या नयन गोरख प्रसाद याच्या सापडलेल्या मोबाईलवरूनच पोलिसांना आरोपीची ओळख पटली, पण तोपर्यंत आरोपी पुण्याहून पश्चिम बंगालला गेला होता. 30 वर्षांचा आरोपी बिरान सुबल कर्माकर हा मूळचा पश्चिम बंगालच्या रायगंजचा आहे. आरोपीला पोलिसांनी हावडा रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group