शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर लँडिंग होताना बॅरिगेट्सचा अडथळा निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हेलिकॉप्टर थोडक्यात बचावले आहे.
शिवजयंतीच्या दिवशी बुधवारी शिवनेरी गडावर हेलिपॅड तयार केले होते. हे हेलिपॅड आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समजते आहे. या हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार असे चौघेही होते. या हेलिकॉप्टर ला लँडिंग करताना हेलिपॅड भोवती जे सुरक्षेकरीता बॅरिकेड्स उभारले होते. त्यामुळे धोका निर्माण झाला होता. यामुळे काही वेळ हे हेलिकॉप्टर हवेत स्थिरावले होते.
हेलिकॉप्टर लँडिंगचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मात्र पायलट ने सावधानता बाळगून पश्चिमेकडून आलेल्या हेलिकॉप्टरचं पूर्व पश्चिम असं लँडिंग न करता हेलिकॉप्टरची दिशा पूर्वेकडून दक्षिणेकडे केली आणि हे हेलिकॉप्टर दक्षिण उत्तर असे सुरक्षितरित्या लँडिंग केलं. हेलिकॉप्टर उतरल्यावर पायलटने हा प्रकार सबंधित विभागाला सूचित करून ही गंभीर चूक लक्षात आणून दिली आणि त्यानंतर हे बॅरिकेड्स हटविण्यात आले.