हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे तरीही अजूनही काही लोक हुंडा मागतात. तसेच लग्नानंतर सुद्धा अनेक स्त्रियांना हुंड्यासाठी छळ केला जातो. हुंडा मिळाल तरच काही लोक लग्नासाठी तयार होतात. परंतु या सर्व बाबींना झुगारून एक नवऱ्यामुलाने जे केले आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. सध्या एक व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यात सासरे हे आपल्या होणाऱ्या जावयाला हुंडा देत होते परंतु जावयाने भर मांडपात तो नाकारला. हे पाहून सासऱ्यांना अश्रू अनावर झाले. हा व्हिडीओ आतापर्यंत कोट्यवधी युझर्सनी पाहिला आहे. त्यामुळे या व्हिडीओची बरीच चर्चा आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय की, नवरा मुलगा हा मंडपात बसला आहे आणि पंडितजी पूजा करत आहेत. या दरम्यान, दक्षिणा देण्याचा विधी सुरू होताच मुलीचे वडील वराला देण्यासाठी नोटांनी भरलेली प्लेट पुढे करतात. तिला पाहताच तो आदराने तिला स्वीकारण्यास नकार देतो. तो त्याच्या हातातला टॉवेलही घडी घालून ठेवतो ज्यामध्ये फळे, फुले आणि इतर गोष्टी असतात. वधूच्या कुटुंबाने वारंवार समजावल्यानंतरही तो मान्य करत नाही. शेवटी 5 लाखांच्या नोटांनी भरलेल्या प्लेटमधून फक्त एक रूपयाचे नाणे काढतो आणि म्हणतो की, ''आता पुरे झाले.'' हे पाहून लग्नात उपस्थित असलेले इतर लोक आनंदाने टाळ्या वाजवू लागतात आणि वराचे कौतुकही करतात. या सगळ्यात मुलीच्या वडिलांचा चेहरा अभिमानाने आणि आनंदाने भरून जातो. ते भावनिक होतात.
इस्टाग्रामवर @shalukirar2021 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ''मुलीच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पहा, असा जावई कुठे सापडतो.'' हा व्हिडिओ आतापर्यंत 7 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक व्हिडिओवर भरपूर कमेंट करून त्या मुलाचे कौतुक करत आहेत.