धक्कादायक ! मालकाच्या जाचाला कंटाळून  कृषी सहाय्यकाची  गळफास घेऊन आत्महत्या
धक्कादायक ! मालकाच्या जाचाला कंटाळून कृषी सहाय्यकाची गळफास घेऊन आत्महत्या
img
दैनिक भ्रमर
आजकाल कामाच्या प्रेशरमुळे टेन्शन घेऊन अनेक आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, सिल्लोडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालकाच्या जाचाला कंटाळून    कृषी सहाय्यकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची  खळबळजनक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील तालुका कृषी कार्यालयात कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड शहरातील तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक योगेश शिवराम सोनवणे यांनी गळफास लावून घेतला. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर शामलाल बरधे आणि कृषी सहाय्यक किशोर उत्तमराव बोराडे यांच्या जाचाला कंटाळून योगेश सोनवणे यांनी गळपास लावून घेतला आहे.

ज्ञानेश्वर बरधे आणि किशोर बोराडे यांनी संगनमत करून योगेश सोनवणे यांना ड्युटीवर असताना अपमानित वागणूक दिली, तसंच मानसिक त्रासही दिला. याशिवाय सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त काम लावलं, या त्रासाला कंटाळून योगेश सोनवणे यांनी गळफास लावून घेतला, असा आरोप योगेश यांच्या घरच्यांनी केला आहे. योगेश यांच्या कुटुंबाने दिलेल्या फिर्यादीच्या आधारे सिल्लोड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group