खळबळजनक !  सीआरपीएफ जवानानं स्वत:च्या हातानं डोक्यात गोळी झाडली, कुठे घडली घटना ?
खळबळजनक ! सीआरपीएफ जवानानं स्वत:च्या हातानं डोक्यात गोळी झाडली, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
आजकल आत्महत्येच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत आहे. दरम्यान, गडचिरोलीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.  केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं आहे. त्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, तसेच त्याचं नाव देखील समोर आलेलं नाहीये. सीआरपीएफ 113 बटालियनचा हा जवान होता. तो  गडचिरोलीमधील धानोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये तैनात होता. त्याने स्वत:च्या बंदुकीने डोक्यात फायर केलं.

या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषीत केलं. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाने आपल्या हातानं डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आहे. त्याने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीनं डोक्यात गोळी झाडली. तो सीआरपीएफ 113 बटालियनचा जवान होता. सध्या त्याची नियुक्ती गडचिरोलीमधील धानोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये होती.  घटनेनंतर या जवानाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केलं. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास 113 बटालियनचे कमांडेड करत आहेत.

या घटनेत जवान गंभीर जखमी झाला होता, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषीत केलं, या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली त्याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group