‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमासाठी प्रताप सरनाईक हे धाराशिव शहरात आले होते. यावेळी ‘पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्या’ अशी मागणी सरनाईक यांच्याकडे करण्यात आली यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात गेल्याचे वक्तव्य केलं.
राज्यसरकारकडून महिलांना लालपरीच्या प्रवासात ५० टक्के सूट अर्थात अर्ध तिकीट दिले होते, यामुळे एसटी महामंडळाला दिवसाला ३ कोटीचा तोटा झाला, अशी कबुलीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसंच, आता यापुढे एसटीत कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही, असं सरनाईकांनी स्पष्ट केलं.
‘पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्या’ अशी मागणी सरनाईक यांच्याकडे करण्यात आली यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात गेल्याचे वक्तव्य केलं. ‘आता लाडक्या बहिणींना ५० टक्के सवलत, ७५ टक्क्यांवरील ज्येष्ठांना सवलत दिली आहे. त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे की, महामंडळ दर दिवसाला ३ कोटी तोट्यात आले. आता अशा मागण्यामुळे सगळ्यांना मोफत सवलत देता येणार नाही.
जर अशाच प्रकारे सवलत देत राहिलो तर एसटी महामंडळ चालवणे कठीण होऊन जाईल. त्यामुळे अशा सवलतीचा विचार करता येणार नाही. एसटीची सेवा ही तळागळातील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. पण माझा संकल्प आहे की आदिवासी बांधवापर्यंत, त्यांच्या पाड्यापर्यंत एसटी बस पोहोचली पाहिजे. या मी मताचा आहे’ असं यावेळी सरनाईक म्हणाले.