दहावीचा मराठीचा पेपर फुटला ! कुठे घडला प्रकार ?
दहावीचा मराठीचा पेपर फुटला ! कुठे घडला प्रकार ?
img
दैनिक भ्रमर
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून म्हणजेच  21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. दरम्यान आजच दहावीचा पहिलाच पेपर फूटला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काहीच वेळात उत्तर पत्रिकेची झेरॉक्स मिळू लागली. जालना जिल्ह्यातील बदनापूर इथं मराठीचा पेपर फुटला.

पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून थेट उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून सर्रास विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमधून समोर आला. 

जालना जिल्ह्यात जवळपास 102 परीक्षा केंद्रांवर साधारण 32 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. धक्कादायक म्हणजे जालन्यात परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. ही गर्दी पाहून पोलीसही हादरले. शासनानं कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती, परंतु पहिल्याच दिवशी या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडाला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group