धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ ?  विद्रोही साहित्य संमेलनात  राजीनाम्याचा ठराव !
धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ ? विद्रोही साहित्य संमेलनात राजीनाम्याचा ठराव !
img
दैनिक भ्रमर
 काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर  धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात येत असून विरोधकाकांडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे

दरम्यान, आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं, या साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले आहेत, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा असा देखील ठराव घेण्यात आला. धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, तर दुसरीकडे आता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group