छावा चित्रपट पाहा अन् हॉटेलच्या बिलात सवलत मिळवा  !   कुठे आहे ही अनोखी ऑफर ?
छावा चित्रपट पाहा अन् हॉटेलच्या बिलात सवलत मिळवा ! कुठे आहे ही अनोखी ऑफर ?
img
दैनिक भ्रमर
छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून या चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता, तर पहिल्याच आठवड्यात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही तो सामील झाला आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर फायटर सारख्या चित्रपटांना छावाने मागे टाकले आहे

दरम्यान, शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पंढरपुरात एक अनोखी ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. छावा चित्रपट पाहून थिएटरचे तिकीट दाखविल्यास हॉटेल ग्रँड येथील जेवणाच्या बिलावर तब्बल 25 टक्के इतकी भरघोस सूट देण्यात आली आहे

महाराष्ट्रासह देशभरात कुठेही छावा चित्रपट पाहिला आणि पंढरपुरात हॉटेल ग्रँड येथे येऊन थिएटरचे तिकीट दाखवले तरी हॉटेलच्या बिलावर 25 टक्के सूट देण्यात येणार आहे. हॉटेल ग्रँड आणि श्रीयस रेस्टॉरंटच्या माध्यमातून दिलीप धोत्रे यांनी ही ऑफर लागू केली आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हॉटेल ग्रँड आणि श्रीयस रेस्टॉरंट यांच्या वतीने दिलीप धोत्रे यांनी ही ऑफर ठेवली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group