नाशिक (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तीन महिने लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित तरुणी व आरोपी नीलेश नामदेव माळोद (वय 27, रा. मानूर, पो. माडसांगवी, ता. जि. नाशिक) हे दोघे एकमेकांशी परिचित आहेत.
दरम्यान, आरोपी नीलेश माळोदे याने दि. 7 जुलै ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी नाशिकरोड परिसरात शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केले.
याबाबत पीडित तरुणीने माळोदेकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने टाळाटाळ केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नीलेश माळोदे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.