बॉक्स ऑफिसवर 'ॲनिमल'ची गाडी सुसाट; सात दिवसात केली एवढी कमाई
बॉक्स ऑफिसवर 'ॲनिमल'ची गाडी सुसाट; सात दिवसात केली एवढी कमाई
img
Dipali Ghadwaje
अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या सर्वाधिक ओपनिंग करण्याऱ्या चित्रपटाचा किताब पटकावला आहे. या चित्रपटामधीलॲक्शन सीन्सचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. आता  रिलीजच्या सातव्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेली आहे.  

 'अ‍ॅनिमल' चं सातव्या दिवसाचं कलेक्शन 
 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता एक आठवडा झाला आहे. 'अ‍ॅनिमल'  या चित्रपटाचा एका आठवड्यात जगभरात 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला, तर या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 300 टप्पा देखील ओलांडला आहे.

Day 1 63.8 कोटी 
Day 2 66.27 कोटी
Day 3 71.46 कोटी
Day 4 43.96 कोटी 
Day 5 37.47 कोटी
Day 6 30.39 कोटी
Day 7     25.50 कोटी

सात दिवसांची एकूण कमाई ₹ 338.85 कोटी

'अ‍ॅनिमल' चित्रपटाची स्टार कास्ट 
संदीप वंगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेला 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट पिता-पुत्राच्या  नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत, रश्मिका पत्नीच्या भूमिकेत आणि बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. 'ॲनिमल' या सिनेमाला सेन्सॉरने 'A' सर्टिफिकेट दिलं.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group