सध्या आकाशामध्ये सर्वांची पतंग उंच असून माझीही पतंग...
सध्या आकाशामध्ये सर्वांची पतंग उंच असून माझीही पतंग...
img
दैनिक भ्रमर

येवला (दिपक सोनवणे) :- सध्या आकाशामध्ये सर्वांची पतंग उंच असून माझीही पतंग आकाशात आहे. निवडणुकीच्या वेळी जे जे पतंग उडवायला येतील त्यांची पतंग कापू असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात पतंग उत्सव दरम्यान केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांच्या निवासस्थानी मंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, राजकारणात निवडणुकीच्या वेळी माझ्या विरोधात उडणाऱ्यांची पतंग कापू.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्यावर जहरी टीका करताना भुजबळ म्हणाले की, माणिकराव शिंदे हे प्रॉपर्टी विकत चालले असून त्यांनी पुन्हा एकदा माझ्या विरोधात उभा रहाव असं चॅलेंज मी करतो. दरम्यान याप्रसंगी सर्व येवलाकारांना भुजबळांनी संक्रांतीच्या शुभेच्छा देखील दिल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला लासलगाव विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, डॉ. संजय जाधव, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, महेश गादेकर, विकी बीवाल, सचिन सोनवणे, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. भुजबळ काय म्हणाले हे ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
इतर बातम्या
Join Whatsapp Group