शिक्षकाकडून काळिमा फासणारे कृत्य;  17 वर्षीय मुलीवर अत्याचार केले , अत्याचारानंतर हत्या,  पुढे जे घडलं......
शिक्षकाकडून काळिमा फासणारे कृत्य; 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केले , अत्याचारानंतर हत्या, पुढे जे घडलं......
img
दैनिक भ्रमर
राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शिक्षकाने एका 17 वर्षीय मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याच  समोर आले आहे. नराधम शिक्षकाने 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली व मृतदेह पाण्याच्या टाकीत लपवला. पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तात्काळ तपासही सुरु केला आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात एका शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या मुलीसोबत घरात घूसून अत्याचार केला. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी त्याने मुलीचा जीव घेतला. कुणालाही समजू नये म्हणून त्यानं मृतदेहाला पाण्याच्या टाकीत फेकले. ही सर्व घटना घडली तेव्हा मुलीच्या घरचे घराबाहेर होते. ते घरी परतल्यानंतर मुलगी घरात दिसली नाही. त्यांनी शोधाशोध सुरु केली.

त्यावेळी मुलीचा मृतदेह मिळाला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह त्यांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली.  

सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या -  
पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रल्हाद गावातील सरकारी शाळेत कार्यकरत होता. तो हिंदी विषय शिकवतोय. त्याचं वर्तन व्यवस्थित नव्हतं. तो मुलींसोबत वारंवार छेडछाड करायचा. त्याशिवाय शारीरिक संबंध करण्यासाठी मुलींवर दबाव टाकत होता. हत्या झालेल्या मुलीसोबतही त्याने छेडछाड केली होती. मुलीने त्याला अनेकदा इग्नोर केले. मुलीने शिक्षकाबद्दल कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर पंचायत बोलवण्यात आली. त्यावेळी आरोपीला समजावून सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या मनात राग वाढला. त्याने शनिवारी संधी पाहून मुलीवर अत्याचार केले अन् त्यानंतर खून केला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रल्हादवर 376, 302, 326, 450 कलमांअतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी फरार आरोपीला सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. 

 
crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group