मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वेगळ वळण, मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याच्या कारची तोडफोड
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वेगळ वळण, मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याच्या कारची तोडफोड
img
Dipali Ghadwaje
राज्य सरकार देऊ केलेलं आरक्षण मनोज जरांगे यांनी नाकरलं असून ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली आहे. त्यानंतर मराठा आंदोलनातील माजी सहकारी अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन मराठा आंदोलनात फूट पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता  मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्याच्या कारची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. 

मनोज जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्या कारवर मनोज जरांगे यांचे फोटो असल्याने तोडफोड झाल्याच बोललं जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या आंदोलनला आता वेगळंच वळण लागलं आहे. राज्य सरकार देऊ केलेलं आरक्षण मनोज जरांगे यांनी नाकरलं असून ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली आहे. त्यानंतर मराठा आंदोलनातील माजी सहकारी अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन मराठा आंदोलनात फूट पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता  मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्याच्या कारची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. 

मनोज जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्या कारवर मनोज जरांगे यांचे फोटो असल्याने तोडफोड झाल्याच बोललं जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर काळकुटे हे गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांची भेटी घेऊन घरी निघाले होते. वडिगोद्री फाटा येथील एका पेट्रोल पंपासमोर त्यांनी कार थोडा वेळ थांबवली होती. त्यावेळी काही अज्ञातांनी येऊन कारची तोडफोड केली.  

या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही आमच्या गाड्या फोडणार तर आमच्याकडेही जशास-तसे उत्तर द्यायला गाड्या आहेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. याप्रकरणी गोंदी पोलिसांत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर काळकुटे हे गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांची भेटी घेऊन घरी निघाले होते. वडिगोद्री फाटा येथील एका पेट्रोल पंपासमोर त्यांनी कार थोडा वेळ थांबवली होती. त्यावेळी काही अज्ञातांनी येऊन कारची तोडफोड केली.  

या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही आमच्या गाड्या फोडणार तर आमच्याकडेही जशास-तसे उत्तर द्यायला गाड्या आहेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. याप्रकरणी गोंदी पोलिसांत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group