पवार बहीण-भावात रक्षाबंधनालाही दुरावा, ताईंनी दादांना राखी बांधलीच नाही....वाचा
पवार बहीण-भावात रक्षाबंधनालाही दुरावा, ताईंनी दादांना राखी बांधलीच नाही....वाचा
img
Dipali Ghadwaje
देशभरात बहिण-भावाचा सण रक्षाबंधन साजरा केला जात आहे. अशातच राजकीय वर्तुळातील नेते मंडळींकडून देखील रक्षाबंधन साजरा केलं जात आहे. सोशल मीडियावर तसे फोटोही समोर येत आहे. मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे रक्षाबंधन साजरे करणार का? आणि सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्याकडून आजच्या दिवशी राखी बांधून घेणार का? याकडे साऱ्याचे लक्ष लागले होते. 

राजकारणामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार या बहीण-भावात कसं अंतर पडलं? हे रक्षाबंधनाच्या निमित्तानं समोर आलं. अजित पवार राखी बांधून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडे आले नाहीत ना सुप्रिया सुळे दादांकडे गेल्या. अजित पवार म्हणाले मी मुंबईत आहे तर सुप्रिया सुळे म्हणाल्या मी नाशिकमध्ये आहे. सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर राखी बांधून घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

मात्र मी नाशिकमध्ये आहे. कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागत करेन, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल्याचे दिसले. अजित पवार जनसन्मान यात्रेसाठी मुंबईत होते. तर लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून ठिकठिकाणी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींकडून राखी बांधून घेतली. तर सुप्रिया सुळे यांनी नाशिकमध्ये खासदार भास्कर भगरेंना राखी बांधली. हा राखी बांधतानाचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकला. तसंच नाशिकच्या दौऱ्यात सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांनाही राखी बांधली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group