विधानसभा निवडणूक 2024 : मनोज जरांगेंकडे आले 900 हून अधिक अर्ज !
विधानसभा निवडणूक 2024 : मनोज जरांगेंकडे आले 900 हून अधिक अर्ज !
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे . दौरे , प्रचार , उमेदवारी चे अर्ज, पक्षांतर असे अनेक गोष्टींची रणधुमाळी सध्या पाह्यला मिळतेय , दरम्यान  मनोज जरंगे यांनी देखील विधानसभानिवडणुकी साठी कसून कंबर बांधल्याचे दिसतेय .  मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आघाडीखाली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ९०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या अर्जांची छाननी या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती दिली जात आहे..

तसेच ,  भुजबळांच्या विरोधात सात उमेदवारांची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जरांगे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतही मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले होते, नंतर त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन देखील केले होते.

जरांगे पाटील यांचे सहाय्यक श्रीराम कुरणकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, कारण सात मराठा उमेदवारांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे.

श्रीराम कुरणकर यांनी सांगितले की, "अर्जदारांमध्ये विद्यमान आणि माजी आमदार, मंत्री, जिल्हा प्रमुख, तसेच जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. काहींना उमेदवारी हवी आहे तर काहींना निवडणुकीत जरांगे-पाटील यांचे समर्थन हवे आहे. विशेष म्हणजे, अनपेक्षितपणे मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत.

दरम्यान , जरांगे-पाटील यांनी इच्छुकांना त्यांची माहिती आणि अर्ज २० ते २४ ऑगस्ट दरम्यान सादर करण्याचे आवाहन केले होते. "आम्हाला २९ ऑगस्ट रोजी निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर करायचा होता, परंतु आता निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने तो पुढे ढकलला गेला आहे," असे एका कार्यकर्त्याने सांगितले. अर्जदारांमध्ये मराठा समाजासह लिंगायत, मुस्लिम, ओबीसी, तसेच अनुसूचित जातीचे लोकही आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group