विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांची जोरदार तयारी सुरू आहे. आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेची निवडणूक लढणारच असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. उमेदवारी साठी ९00 हून अधिक अर्ज त्यांच्याकडे आले आहे. दरम्यान , आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही 288 उमेदवार पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. याआधी मनोज जरांगे प्रत्येक भाषणात 288 उमेदवार पाडणार असल्याचं बोलत होते. पण आता त्यांनी नवा आकडा दिला आहे. नव्या आकड्यानुसार जरांगे आता फक्त 113 उमेदवार पाडणार आहेत. जरांगे यांनी नवीन आकडा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जरांगे यांनी यूटर्न घेतला का? अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.
मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीहेत आहेत .एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते बोलत होते .राजकीय निर्णय घेण्यासाठी आम्ही बैठक बोलावली आहे. त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे. उमेदवार पाडायचे की निवडणूक लढवायची याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. पुढच्या राजकीय बैठकीतच हा निर्णय होईल. तालुक्याच्या ठिकाणीही आमच्या बैठका होत आहेत. मराठवाडा आणि विदर्भात आम्ही घोंगडी बैठका घेणार आहोत. आम्ही एक आहोत. हे कुणाला दाखवण्याची आता गरजच उरलेली नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.