...तर आणखी इनकमिंग होणार; नक्की काय म्हणाले शरद पवार , वाचा
...तर आणखी इनकमिंग होणार; नक्की काय म्हणाले शरद पवार , वाचा
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीला आता हळूहळू रंग चढायला लागला आहे. त्यातच राजकीय नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचा खेळही सुरु झाला आहे. अजित पवारांसोबत गेलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांसोबत असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर मनसेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरेंनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती.

यानंतर आमच्याकडं आणखी इनकमिंग होईल आणि त्या मागचं कारणंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत त्याप्रमाणं तुमच्या पक्षात इनकमिंग वाढत चाललं आहे. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, "हे इनकमिंग आणखी झालेलं दिसेल. एकदा दुसऱ्या बाजूकडून उमेदवारांच्या निवडीचे निर्णय जाहीर झाले की हे इनकमिंगचं प्रमाण जास्त झालेलं दिसेल"

दरम्यान, अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील जागा वाटप पूर्ण झालेलं नाही. काही जागांवर अद्यापही खलबतं सुरुच आहेत. एकदा महायुतीचं संपूर्ण जागा वाटप झालं आणि त्यात इच्छुकांना जर संधी मिळाली नाही तर हे लोक दुसऱ्या पक्षात संधी शोधत येतात. त्यानुसार, अजित पवारांकडं गेलेले अनेक जण आपल्याकडं येतील असा दावाच शरद पवारांनी केला आहे.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group