मविआतील मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांच मोठं वक्तव्य, म्हणाले ...
मविआतील मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांच मोठं वक्तव्य, म्हणाले ...
img
दैनिक भ्रमर

विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे . दरम्यान , महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत दरम्यान,  या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत मागणी आहे. 

दरम्यान ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीत शरद पवार यांचा पक्ष कालपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही नव्हता. कारण शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याआधीच त्याबाबतचं मत मांडलं होतं. पण काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु होती. 

दरम्यान  आता , शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य करुन महाविकास आघाडीत नवीन खळबळ निर्माण झाली आहे. “निडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाचा निर्णय घ्यायचा असतो”, असं शरद पवार म्हणाले आहेत. “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आताच जाहीर करावा, असं आवश्यक नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची काय भूमिका असेल? असा प्रश्न उपस्थित होतोय.

“मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आता काहीच कारण नाही. निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपदाचा विचार, अजून कशाचा काही पत्ता नाही. बहुमत मिळेल यात शंका नाही, पण आताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही. 1977 साली आणीबाणीनंतर निवडणूक झाली. तेव्हा कुणाचंही नाव पुढे केलं नव्हतं. मतं मागताना मोरारजी देसाई यांचं नाव नव्हतं. पण निकालानंतर त्यांचं नाव पुढे आलं. त्यामुळे आताच नाव जाहीर केलं पाहिजे, असा आग्रह करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तीनही पक्ष एकत्र बसू आणि राज्याला स्थिर सरकार देऊ”, असं शरद पवार म्हणाले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group