राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ट्विटद्वारे प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ट्विटद्वारे प्रतिक्रिया; म्हणाले...
img
दैनिक भ्रमर
लोकसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. महानगर पालिकेच्या निवडणुका लांबल्या.

देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. मला वाटाघाटीमध्ये पाडू नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली.

राज ठाकरेंच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या घोषणेनंतर राज्यातील विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पण प्रतिक्रिया दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा काय लिहिले आहे फडणवीस यांनी ट्विट मध्ये

इतर बातम्या
Join Whatsapp Group