मतदान सुरु होण्यापूर्वीच अनिल अंबानी मतदानासाठी रांगेत, व्हिडिओ आला समोर
मतदान सुरु होण्यापूर्वीच अनिल अंबानी मतदानासाठी रांगेत, व्हिडिओ आला समोर
img
Dipali Ghadwaje
देशात सर्वसामान्य व्यक्तीपासून बड्या व्यक्तीपर्यंत सर्वांना मतदानाचा समान अधिकारी आहे. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी मतदान सुरु होण्यापूर्वी रांगेत लागलेले दिसुन येत आहे. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिलायन्स अनिल धीरूभाई अंबाणी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानीसुद्धा सकाळीच बाहेर पडले. सकाळी ६.४५ च्या सुमारास मतदान सुरु होण्यापूर्वी ते रांगेत लागले होते. कुलाबा मतदान केंद्राबाहेर मतदान सुरु होण्याची ते वाट पाहत होते. कप परेडमध्ये राहणारे अनिल अंबानी रांगेत काही जणांशी संवाद साधत होते. त्या रांगेत त्यांचा आठ ते दहावा क्रमांक दिसत होता. मुंबईतील गर्मीचा त्रास त्यांना होत होता. अनिल अंबानी रांगेत उभे असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. २८ सेंकदाचा हा व्हिडिओ असून त्यात अनिल अंबानी मतदान केंद्राबाहेर वाट पाहताना दिसत आहे.


लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील   सहा जागांवर २० मे रोजी मतदान सुरु झाले. मतदानासाठी सकाळापासून सर्वसामान्य मतदारांनी रांगा लागल्या. त्याच्याप्रमाणे बॉलीवूडमधील कलाकार, उद्योजक मतदानासाठी बाहेर पडले. राज्यातील सर्वत्र मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group