नाशिकरोडला दोन वेळा मशिन बंद पडल्याने गोंधळ
नाशिकरोडला दोन वेळा मशिन बंद पडल्याने गोंधळ
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- येथील तक्षशीला विद्यालयात सुरु असलेल्या मतदान केंद्रावरील वोटिंग मशिन बंद दोन वेळा बंद पडल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

आज सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर  बूथ नंबर 149 मधील ईव्हीएम सकाळी 11:02 मिनिटांनी बंद पडले. मशिन तज्ञ दाखल झाल्यावर पुन्हा चालू केले.

मात्र पुन्हा दुपारी 12:20 वाजेला मशिन बंद पडल्याने नागरिकांनी गोधळ निर्माण केली आहे. काही नागरिक मतदान न करता निघून गेले. तात्काळ अधिकारी सुशांत गांगुर्डे व सहकारी यांनी धाव घेऊन मशिन चालू करण्याचा प्रयत्न केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group