राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाला नोटीस दिली आहे. त्या खासदाराने केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह आहे. त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार रमेश बिधुडी यांच्या विरोधातलोकसभा सचिवालयाकडे हक्कभंगाची नोटीस सुप्रिया सुळे यांनी पाठवली आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांच्या संसदेतील वक्तव्यावर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याबाबत अपशब्द वापरले. ज्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असून खासदार सुप्रिया सुळे यांनी रमेश बिधुडी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार रमेश बिधुडी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे. रमेश बिधुडी यांनी केलेलं वक्तव्य हक्कभंगाच्या कारवाईत बसते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी या नोटीसीमधून केली आहे.
बिधुडी यांचे वक्तव्य लोकसभेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणार आहे, नियमानुसार हे वक्तव्य हक्कभंगमध्ये बसत त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करत प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा.. असे सुप्रिया सुळे म्हणाले.
नेमका वाद काय ?
लोकसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे (बसपा) खासदार दानिश अली यांच्याबाबत अपशब्द वापरले. खासदार दानिश अली यांना दहशतवादी संबोधले, लोकसभेत चांद्रयान-३ बाबत चर्चा सुरू असतना हा संपूर्ण प्रकार घडला. ज्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.