गोविंदा आला रे आला...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रो गोविंदा लीगची घोषणा ; जाणून घ्या
गोविंदा आला रे आला...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रो गोविंदा लीगची घोषणा ; जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (22 जुलै) प्रो गोविंदा लीगची घोषणा केली. त्यामुळे जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीच्या आयोजनाची रंजकता वाढणार असून त्यासाठी पथके तयार करण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना संघात समाविष्ट करण्यासाठीही बोली लावली जाणार आहे.

यंदा त्याची प्रक्रियाही सुरू झाली असून संघांनी गोविंदांसाठी बोली लावण्यास सुरुवात केली आहे. ज्याप्रमाणे आयपीएलमध्ये घडते त्याचप्रमाणे आता प्रो गोविंदामध्ये पाहायला मिळणार आहे. 

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रो गोविंदा लीग 2024 ची घोषणा केली. इतकेच नाही तर आयपीएलच्या धर्तीवर प्री-क्वालिफायरही होणार आहे.प्रो गोविंदा लीगसाठी एकूण 32 संघांनी आपली नोंदणी केली असून 27 ते 28 जुलै रोजी प्री-क्वालिफायरचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये 16 संघ पात्र ठरतील आणि त्यानंतर हे संघ 18 ऑगस्ट रोजी एसव्हीपी स्टेडियमवर मुख्य स्पर्धेत भाग घेतील.

या कार्यक्रमाची घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘दहीहंडी कार्यक्रम ही महाराष्ट्राची परंपरा आहे. या कार्यक्रमांमध्ये लोक एकत्र येतात आणि कार्यक्रमाचा एक भाग बनतात. अशा स्पर्धांचे आयोजन केल्यास देशभरात दहीहंडीची लोकप्रियता वाढेल. अधिकाधिक गोविंदांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही प्रेरित करु, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

या लीगच्या आयोजनाची जबाबदारीही एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे पूत्र पूर्वेश सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. पूर्वेश सरनाईक यांना या लीगचे संस्थापक अध्यक्ष बनवण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देताना पूर्वेश सरनाईक म्हणाले की, दहीहंडीचा कार्यक्रम देशभरात ओळखला जावा अशी आमची इच्छा आहे. आयपीएल आणि प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर आम्ही हे करू आणि त्याच आधारावर त्याचे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत 12 संघ तयार करण्यात आले आहे.

गोविंदा गटांना संघाच्या जर्सी देण्यात येणार असून त्यावर त्यांची नावेही लिहिली जाणार आहेत. ठाणे टायगर्स, मुंबई युनायटेड अशी या संघांची नावे असतील. तसेच जय जवान, संयुक्त कोकण नगर. आम्ही औपचारिक करार केले आहेत. पूर्वेश म्हणाले की, प्रत्येक गोविंदा ग्रुपला चांगली फी दिली जाईल. याशिवाय बक्षिसेही दिली जातील. बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर करण्यात येणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group