आदित्य ठाकरेंनी सलग तीनवेळा देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट ; राजकीय वर्तुळात  चर्चांना उधाण
आदित्य ठाकरेंनी सलग तीनवेळा देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीनवेळा भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. 

 मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली आहे. 

आज सकाळीच आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. आजची ही भेट तिसरी भेट होती. कारण... या आधी आदित्य ठाकरे यांनी नागपुरात अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या सलग भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

मागच्यावेळी ठाकरेंनी भेट घेतली त्यावेळी त्यांनी माध्यमांना ही भेट मुंबईतील विविध प्रश्नांसंदर्भात होती अशी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील विविध प्रश्नांबाबत ते भेट घेणार आहेत, तर दोन दिवसापूर्वी झालेल्या टोरेस घोटाळ्या संदर्भात चर्चा करु शकतात.

आमदार आदित्य ठाकरेंनी काय सांगितले? 

सर्वच पोलिस कॅम्पसमध्ये दंडनीय शुल्क लावला आहे. तो शुल्क स्थगित करण्याची मागणी केली. मागच्या सरकारने यावर स्थगित देणार सांगितले होते पण त्यांनी तसे केले नाही. मुंबई पोलिसांना मुंबईतच घर मिळावेत अशी मागणी केली. तसेच आमच्या सरकारच्या काळात सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती, पण मागच्या सरकारने हे स्थगित केले. ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्याची मागणी केली. याबाबत आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली अस आदित्य ठाकरे म्हणाले .

"मुंबईत टोरेस घोटाळा झाला आहे, त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली. पाणी आणि पोलिसांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर पॉझिटिव्ह आहेत. आमच्या होणाऱ्या भेटीगाठी जनहीताच्या कामासाठी आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group