त्या अपघातात अमोल कोल्हे जखमी ; समोर आली ही माहिती
त्या अपघातात अमोल कोल्हे जखमी ; समोर आली ही माहिती
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. शिवनेरीवरून आज या यात्रेचा शुभारंभ झाला, मात्र मोठा अनर्थ होता होता टळला. जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेनमधून पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाला आणि क्रेन कलंडली.  

दरम्यान अपघात या अमोल कोल्हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या क्रेनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे तसेच मेहबूब शेखही होते, मात्र थोडक्यात बचावले आहेत.

त्यानंतर जुन्नरच्या लेण्याद्रीत कोल्हे सभेला हजर राहिले, पण मंचरच्या सभेपूर्वी त्यांनी रुग्णालय गाठलं. डॉक्टरांकडून उपचार घेत, हाताला बँडेज लावून ते यात्रेत सहभागी झाले आहेत. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group