ठरलं तर मग ! विधानसभेसाठी महायुतीचं ''हे'' घोषवाक्य, ''या'' दिवशी करणार प्रचाराला सुरुवात
ठरलं तर मग ! विधानसभेसाठी महायुतीचं ''हे'' घोषवाक्य, ''या'' दिवशी करणार प्रचाराला सुरुवात
img
दैनिक भ्रमर
राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे . या पार्श्वभूमीवर  महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीनं प्रचारात आघाडी घेतील असून विधानसभा निवडणुकीसाठी घोषवाक्य देखील ठरवण्यात आलं आहे. ‘एकजुट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेवून महायुती राज्यभर आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. ठाण्यातील महायुती मेळाव्यात भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत घोषणा केली.

⁠’एकजुट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेवून महायुती राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. ठाण्यातील महायुती मेळाव्यात भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत घोषणा केली. ठाण्यात आज महायुती समन्वयक समितीचा मेळावा सुरु आहे, या दरम्यान प्रसाद लाड यांनी ही घोषणा केली आहे. तसंच महायुतीकडून सोशल मीडिया आर्मी देखील तयार करण्यात येणार आहे. फेक नरेटिव्हला उत्तर देण्याचं काम ही सोशल मीडिया आर्मी करणार आहे.

दरम्यान,  24 ऑगस्टला विधानसभेसाठी महायुतीच्या प्रचाराचा  होणार आहे. ठाण्यातून पहिली प्रचार यात्रा निघणार आहे. तीन दिवस ही प्रचार यात्रा चालणार आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबई अशी ही महायुतीची प्रचार यात्रा असणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group