अटल सेतू वर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेचे कॅब चालकाने वाचवले प्राण
अटल सेतू वर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेचे कॅब चालकाने वाचवले प्राण
img
दैनिक भ्रमर
अटल सेतू वर काल एका 56 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही महिला कॅबने पूलावर आली होती. मध्येच तिने गाडी थांबवून आत्महत्या करण्यासाठी पूलावरून उडी मारली. मात्र यावेळी कॅब चालकाने या महिलेची माहिती पोलिसांना दिली आणि तातडीने ते आले. यावेळी पोलिसांचं प्रसंगावधान आणि कॅब चालकाची समयसूचकता यांनी महिलेला वाचवण्यात यश आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत असून या कॅब चालकाचं नेटकर्‍यांकडून कौतुक होत आहे.

मुंबईतील अटल सेतूवरून उडी मारून जीव देण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात घ़डल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच दादरमधील एका डॉक्टरने तसेच त्यानंतर एका बिझनेसमननेदेखील अटल सेतूवरून उडी मारून आयुष्य संपवलं होतं. तशीच एक घटना मुंबईत शुक्रवारी पुन्हा घडली. याच थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो पाहूनच हादरायला होतं.

मिळलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे नाव रीमा पटेल असून ती 56 वर्षांची आहे. रीमा ही मुलुंड येथील रहिवासी आहे. शुक्रवारी तिने कॅब बूक केली आणि अटल सेतूवर पोहोचल्यावर ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. त्यानंतर उतरून ती रेलिंगच्या पलीकडे जाऊन उभी राहिली, मात्र हाँ प्रकार बघताच कॅबचालही उतरला आणि प्रसंगावधान राखत त्याने महिलेला धरून ठेवले. अटल सेतूवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असल्याने, कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यांना ती महिला दिसली आणि त्यांनी तातडीने पेट्रोलिंग टीमला सूचना दिली. सूचना मिळताच लगेचच चार कर्मचाऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. त्या अधिकाऱ्यांची कार तेथे पोहोचताच त्या महिलेने समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण तेथे उभ्या असलेल्या कॅब ड्रायव्हरने लगेच तिच्या केस पकडून तिला धरून ठेवले अन् तिचा हातही पकडला.

त्यानंतर गाडीतून उतरून 4 ते 5 पोलिसांनी धाव घेत त्या महिलेला कसेबसे वर खेचून तिचे प्राण वाचवले. महिलेला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यासाठी ते अधिकारी स्वत: रेलिंगवर चढले होते आणि त्यांनी स्वत:चा जीवही धोक्यात टाकला. मात्र त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या महिलेला वाचवलं. त्यांच्या या शौर्याचे कौतुक केले जात आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश सोनवणे, मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवलेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group