दुर्दैवी  !  बाईकवरुन शूटींगसाठी निघालेल्या अभिनेत्याचा भरधाव ट्रकच्या धडकेत  मृत्यू
दुर्दैवी ! बाईकवरुन शूटींगसाठी निघालेल्या अभिनेत्याचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू
img
Dipali Ghadwaje
मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत झालेल्या अपघातात एका टिव्ही अ‍ॅक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत अभिनेता अमन जयस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत टीव्ही ॲक्टर अमन जयस्वाल याचा अपघात झाला आणि यातच त्याचा मृत्यू झालाय. दरम्यान, अभिनेत्याच्या अपघाती मृत्यूनंतर कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , 22 वर्षीय टीव्ही ॲक्टर अमन जयस्वाल शूटिंगसाठी जोगेश्वरी पश्चिम मधून बाईकवर जात होता. याचवेळी भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने अमनला जोरदार धडक दिली. यामध्ये अमन गंभीररित्या जखमी झाला होता. उपचारासाठी जखमी अमनला जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान अमन जैस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून आंबोली पोलिसांनी ट्रक चालकाचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस फरार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group