टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक माहिती उघड ,
टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक माहिती उघड , "दहावी नापास तरुण होता...." ; वाचा
img
Dipali Ghadwaje
टोरेसमधील 1000 कोटींचा गुंतवणूक घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी कंपनीत काम करणारा अकाऊंटंट अभिषेक गुप्ता याने याप्रकरणी अलर्ट दिला होता असं उघड केलं आहे.

अभिषेक गुप्ताने मुंबई पोलीस तसंच सक्तवसुली संचलनालयाकडे तक्रार दाखल केली होती. टोरेसमध्ये बेकायदेशीर गोष्टी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण आपण सांगूनही प्रशासनाकडे याकडे लक्ष दिलं नाही असा आरोप अभिषेख गुप्ताने केला आहे. 

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ,  अभिषेक गुप्ताने 30 डिसेंबरला पहिली तक्रार दाखल करत या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काही अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबई पोलिसांनी सानपाडातील स्टोअरमध्ये छापा टाकण्याची योजना आखली होती. पण त्याआधीच मुख्य आरोपी फरार झाला.

दरम्यान अभिषेक गुप्ताने आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचा आरोप करत शिवाजी पार्क पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 
 
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "अभिषेक गुप्ता धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती देण्यासाठी भायखळा पोलीस ठाण्यातही गेला होता. दरम्यान मुख्य आरोपींनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्टोअरमध्ये सोडून जाण्याआधीच मोठा मुद्देमाल लुटून नेल्याचं दिसत आहे. आम्ही अभिषेक गुप्ता खरं बोलत आहे की आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे याची माहिती घेत आहोत".

दरम्यान टोरेस कंपनीने अभिषेक गुप्ता आणि सीईओ तौसिफ रियाज दुकानाची तोडफोड करण्यात आणि लूट करण्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. यामुळे कंपनीचे गुंतवणूकदार त्यांच्या विरोधात गेले.

दरम्यान फरार असलेला सीईओ तौसिफ रियाझ हा अल्पशिक्षित होता असंही उघड झालं आहे. त्याने दहावीची परीक्षाही दिलेली नव्हती. भायखळा येथील आधार केंद्रावर तो ऑपरेटर म्हणून काम करायचा असंही उघड झालं आहे. तसंच सीईओ दिसण्यासाठी तो फॉर्मल कपडे घालत असे. 

दरम्यान टोरेस स्कॅमचे मास्टरमाईंड दोन युक्रेनिअन नागरिकांनी आणला होता. दरम्यान हा घोटाळा उघड होण्यापूर्वीच दोघे देश सोडून फरार झाले. व्हिक्टोरिया कोवालेन्को आणि ओलेना स्टॉईन हे दोन फरार युक्रेनिअन नागरिक यामध्ये सहभागी होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group