पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडले. करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानत वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव इतिहासात कोरलं जाईल, असं म्हणत वाढवण बंदर प्रकल्पानंतर आता पालघरमध्ये एक विमानतळ उभारण्यात यावं, अशी मागणी फडणवीसांनी केली.
मी आज एक विनंती करू इच्छितो. जगभरात अनेक ठिकाणी विमानतळं अशा प्रकारे तयार केलेले आहेत. येणाऱ्या काळात मुंबई अजून वाढणार आहे. वसई विरार, पालघर या ठिकाणीही मुंबई वाढेल. आज आपण वाढवण बंदराचं भूमिपूजन करत आहोत. याचबरोबर आपण विमानतळाबाबतचा निर्णय देखील घेतला आणि पालघरमध्ये तिसरं मोठं विमानतळ उभारलं तर आपण मुंबईला नक्कीच बदलू शकतो”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
तसेच , “आजचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. मुंबईमधील पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे आपण एक नंबर ठरलो. आता त्याहीपेक्षा तीनपट मोठं वाढवण बंदर तयार होत आहे. गेले ३० ते ४० वर्ष आपण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे एक नंबर ठरलो. मात्र, आता वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र एक नंबर राहील. हे सर्व फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झालं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पोर्टचा दर्जा दिला. यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण जिंकलो. आज ही परिस्थिती आहे की, या वाढवण बंदराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. कोणत्याही देशाच्या इतिहासात एक असा व्यक्ती असतो की तो व्यक्ती देशाच्या विकासासाठी टर्निंग पॉइंट ठरतो. वाढवण बंदरामुखे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देखील इतिहासामध्ये नोंदवलं जाईल. भारताला पुढे नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.