विधानसभेच्या आधी शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का !  18 माजी नगरसेवकांसह...
विधानसभेच्या आधी शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का ! 18 माजी नगरसेवकांसह...
img
दैनिक भ्रमर
विधानसभेच्या आधी राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले दिसतेय . सर्वचपक्षांत मोठं मोठ्या घडामोडी घडत आहेत . त्यात नेत्यांचा पक्षांतरच्या अनेक घडामोडी घडत आहेत . दरम्यान  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद  पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे . समरजित घाटगे उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. कागलमध्ये होणाऱ्या शरद पवारांच्या सभेत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. भाजपचे समरजित घाटगे 18 माजी नगरसेवकांसह कागलमध्ये तुतारी फुंकणार आहेत. उद्या कागलमध्ये होणाऱ्या सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाटगेंचा शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे.

महायुतीत कागलची जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची आहे. मात्र, दुसरीकडे कागलमध्ये शरद पवारांकडे उमेदवार नव्हता. त्यामुळे आता समरजित घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार असून ते कागलमधून निवडणुकीच्या मैदानात उतरु शकतात. कागलमध्ये सध्या अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ हे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेत कागलमधून हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंमध्ये सामना होऊ शकतो.

दरम्यान , कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगेंचा दांडगा जनसंपर्क आहे. कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलंय. मात्र, आता ते शरद पवार गटात जाणार असल्यानं कोल्हापुरात भाजपला मोठा झटका बसणार आहे. भाजपला धक्का देत समरजित घाटगे उद्या तुतारी हातात घेणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत कागलमधून हसन मुश्रीफांना समरजित घाटगे तगडं आव्हान देण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group