''सत्ता कुणाचीही असो, रामदास आठवले यांचे स्थान पक्के'', नितीन गडकरी यांचं वक्तव्य
''सत्ता कुणाचीही असो, रामदास आठवले यांचे स्थान पक्के'', नितीन गडकरी यांचं वक्तव्य
img
दैनिक भ्रमर
मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आठवले यांच्या राजकीय कारकीर्दीचे कथन केले. आठवले यांनी समाजासाठी मोठा संघर्ष केल्याचे अधोरेखित करून आठवलेंना दीर्घायुष्य लाभो, अशी मनोकामना गडकरी यांनी व्यक्त केली.

चौथ्यांदा सरकार येण्याची आम्हाला गॅरंटी नाही मात्र रामदास आठवलेंना आहे. सरकार कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे मंत्रिपद पक्के असते, अशी फटकेबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

रामदास आठवले यांनी मनोगतामध्ये आतापर्यंत तीनवेळा मंत्रीपद मिळाले आणि चौथ्यांदा आमचे सरकार आल्यावर मंत्री होणारच असल्याचे वक्तव्य केले. त्यावर गडकरी यांनी भूमिका मांडली. “रामदास आठवले यांनी दलित पॅंथर संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे काम केले. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमांतून त्यांनी महाराष्ट्रात रिपब्लकिन चळवळ शक्तीशाली बनविण्याचे काम केले. केंद्रात यापूर्वी ते मंत्री होते आणि आता तिसऱ्यांदा ते मंत्री आहेत. आता पुढे होणाऱ्या निवडणुकीत आमचे सरकार येऊन त्यांना मंत्री होण्याची गॅरंटी आहे. मात्र आम्हाला मात्र नाही आहे. गंमतीने मी नेहमीच म्हणत असतो राज्य कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे स्थान पक्के आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“गेल्या मंत्रीमंडळात आठवले केंद्रात मंत्री असताना त्यावेळी लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान यांना म्हणाले होते की, रामदास आठवले हे राजकीय मौसमी शास्त्रज्ञ आहेत. राजकारणात पुढे काय होणार आहे याची सर्व माहिती आठवले यांना असते”, असेही नितीन गडकरी म्हणाले . 
इतर बातम्या
Join Whatsapp Group