चिपळूणमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा
चिपळूणमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा
img
दैनिक भ्रमर
 आगामी विधानसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली. पक्ष फुटीनंतर प्रथमच ते चिपळूणमध्ये आले आहेत . दरम्यान , चिपळूणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

शरद पवार यांच्या चिपळूण मधील सभेला प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चिपळूणसह इतर अनेक तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सभास्थळी जमले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे

शरद पवार यांची चिपळूण शहरातील बहादूरशेख येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर आज ही सभा होणार होत आहे. या सभेला राष्ट्रवादी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या या सभेची तयारी प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी केली आहे. या सभेतून खासदार शरद पवार निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. 

दरम्यान , या सभेपूर्वी शरद पवारांनी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सहकार भावनाला भेट दिली. यावेळी पतसंस्थेच्या विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला. तर दुसरीकडे भास्कर जाधव यांनी शरद पवार यांची चिपळूणमध्ये भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे भास्कररराव जाधव म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group