राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका होत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची बैठक सुरु आहे. गेल्या तासाभरापासून नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा होत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.