कांदा पाठोपाठ बिगर बासमती तांदुळावरील निर्यात बंदी शिथिल
कांदा पाठोपाठ बिगर बासमती तांदुळावरील निर्यात बंदी शिथिल
img
दैनिक भ्रमर
लासलगाव वृत्तसेवा -कांदा पाठोपाठ  बिगर बासमती तांदूळ निर्यातीवरील बंदी शिथिल केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भारत सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व व्यापार विभागाच्या सचिव संतोष कुमार सारंगी यांनी याबाबतचे नोटिफिकेशन काढून माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवली आहे. अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील कमी करत २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले आहे. सरकारने याआधी २०२३ मध्ये तांदळाच्या देशातील  दर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदी केली होती. पण आता बंदी हटवण्यात आल्यामुळे देशभरातील तांदूळ निर्यातदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group