राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेनं तोडफोड केल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे ‘अशा घटना घडत असतात. अशा गोष्टी चालू असतात. मानसिक तणावात असलेल्या तोडफोड करणाऱ्या महिलेला ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्यांच्याकडे थोडं सहानुभूतीने पाहिल पाहिजे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये सध्या लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महिला मेळावे होत आहे. कार्यक्रम आयोजित केले जात आहे. यावेळी अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका महिलेनं तोडफोड केल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
‘अशा घटना घडत असतात. अशा गोष्टी चालू असतात. मानसिक तणावात असलेल्या तोडफोड करणाऱ्या महिलेला ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्यांच्याकडे थोडं सहानुभूतीने पाहिल पाहिजे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. तसेच , ‘विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने महायुती सत्तेत येईल. भाजप येईल. त्याची महाराष्ट्राला गरज आहे. टीका करणे हे विरोधकांचं काम आहे. टीका करणे यात काही नवीन नाही. काही लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ आहे. ते होऊ नये आर्थिक दृष्ट्या महिलांना गरज आहे. ते पैसे त्यांना मिळू द्यावे यात कुठे अडकाठी टाकू नये’ असं म्हणत अमृता फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.