"बहीण चिडली असेल तर... मंत्रालयातील कार्यालय तोडफोड प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
img
दैनिक भ्रमर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याने राजकीय  वर्तुळात एकच खळबळ उडाली.  दरम्यान देवेंद्र  फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या महिलेची काही व्यथा आहे का हे समजून घेऊ,’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  नाशिक दौऱ्यावर असताना प्रसार माध्यमांशी ते बोलत होते .

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात एका महिलेने तोडफोड केली. यावर 'लाडकी बहीण चिडली' असा उपरोधीक टोला विरोधकांकडून लावण्यात आला आहे. हाच धाका पकडत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, या प्रकरणाची मी माहिती घेतली आहे.  ‘ती महिला कोण आहे तीची काय मागणी आहे, याची माहिती मी घेतली आहे. त्या महिलेची काही व्यथा आहे का हे समजून घेऊ, तिचं काही म्हणणं असेल तर समाधान केलं जाईल. पण विरोधक हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. त्यांच्या काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत. 

पण कोणी खालच्या स्तरावर उतरले म्हणून माझ्या सारख्यांनी खालच्या स्तरावर थोडी उतरायचं असतं? एखादी बहीण चिडली असेल तर तिची व्यथा आपण समजून घेऊ. परंतु कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तरीही त्या महिलेची बाजू समजून घेऊ, असं फडणवीस म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group