वाहतूक विभागाचा नवीन नियम ! हेल्मेट घातलं असेल तरीही ''या'' कारणाने भरावा लागेल दंड
वाहतूक विभागाचा नवीन नियम ! हेल्मेट घातलं असेल तरीही ''या'' कारणाने भरावा लागेल दंड
img
दैनिक भ्रमर
वाहतूक नियंत्रणासाठी अनेक नवीन नियम आणत आहेत. वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन वाहतूक नियमांचा अवलंब करण्यात येत आहे. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक विभागाने काही नियम केले आहेत. हेल्मेट घालणं, बाईकवर ट्रिपल सीट प्रवास न करणं असे काही नियम दुचाकी वाहनांसाठी बनवलेले आहेत. हेल्मेट घातलेलं असेल आर्थिक दंडापासून सुटका तर मिळतेच शिवाय अपघाताच्या वेळी डोक्याचं दुखापतीपासून संरक्षण देखील होतं. 

सध्या मार्केटमध्ये ‘आयएसआय’ चिन्ह असलेल्या हेल्मेटसोबत निकृष्ट दर्जाचे स्वस्त हेल्मेट देखील मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. हेल्मेटचा वापर बंधनकारक करूनही काही लोक ते डोक्यात घालत नाहीत. काही लोक हाताला किंवा गाडीला हेल्मेट लटकवतात. तर काहीजण हेल्मेटचा बेल्ट न लावता फक्त त्यात डोकं घालतात. असं आढळल्यास आता दंड आकारला जाणार आहे.

भारत सरकारने 1998च्या मोटार वाहन कायद्यात बदल केले आहेत. त्यानुसार दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घातल्यास किंवा नीट न घातल्यास दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल. घातलेल्या हेल्मेटचा बेल्ट लावलेला नसेल तर एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

अनेकदा लोक हेल्मेट घातल्यानंतर त्याचा बेल्ट लावत नाहीत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप धोकादायक आहे. जर हेल्मेटचा बेल्ट लावलेला नसेल आणि अपघात झाला तर हेल्मेट निघून जाऊन डोक्याला गंभीर दुखापत होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली असून अशा प्रकरणांमध्ये तात्काळ दंड आकारला जात आहे.

नेहमी चांगल्या कंपनीचं आणि चांगल्या दर्जाचं हेल्मेट वापरावं. हेल्मेटवर आयएसआय मार्क असला पाहिजे. चांगल्या दर्जाच्या हेल्मेटची किंमत किमान 1000 रुपये आहे. सुमार दर्जाचे हेल्मेट 300 ते 400 रुपयांमध्ये मिळतात. पण, असे हेल्मेट खरेदी करणं टाळावं. जर तुम्ही आयएसआय मार्क नसलेलं हेल्मेट घातलं असेल तर तुम्हाला मोटार वाहन कायद्यातील कलम 194D MVA अंतर्गत एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group