माजी IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने पूजाच्या अटकेपासून अंतरिम संरक्षणाची मुदत 4 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी पूजा खेडकर यांच्या वकिलाने केलेल्या विनंतीनंतर अटकपूर्व जामीन मागणाऱ्या पूजाच्या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली.
न्यायमूर्ती चंद्र धारी यांनी सांगितले की, याचिकाकर्त्याच्या वकिलाने केलेल्या विनंतीनंतर आता या प्रकरणावर 4 ऑक्टोबरला सूनावणी घेण्यात येईल. तोपर्यंत कारवाईचा अंतरिम आदेश सुरू राहील. पूजा खेडकर हिच्यावर 2022 च्या UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी OBC आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तिच्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, पूजा खेडकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला माहिती दिली की, तपासात या प्रकरणाशी संबंधित मोठे कट उघड होत आहे. 12 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने यापूर्वी दिल्ली पोलिसांना माजी IAS पूजा खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते.
नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा लाभ घेतल्याच्या आरोपाखाली पूजा खेडकर विरोधात
विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.